लेखनासाठी संपर्क

या ब्लॉगवर काही प्रत्यक्ष अनुभव तर काही विषयांवरील विचार, वैयक्तिक मत मांडण्याचा येथे प्रयत्न करीत आहे. वेगवेगळ्या विषयांवरील आपला विचार किंवा आपलं म्हणणं लिहून काढलं की ते आपल्याला नव्यानं उमगतं.

गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे  या ब्लॉगचे लेखन करीत असताना लेखनाशी संबंधित विविध अनुभव घेता आले; उदाहरणार्थ, 
१. ज्ञान प्रबोधिनीच्या युवा दीपावली विशेषांकासाठी ललित लेखन व कवितालेखन 
२.शिक्षणविवेक या मासिक नियतकालिकात  कुमार वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी विविध विषयाशी संबंधित लेखमाला
३.आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांसाठी एकांकिका लेखन
४. तांत्रिक विषयांशी संबंधित इंग्लिश व मराठी भाषांत अनुवाद 

लेख/स्तंभलेखन/पुस्तक परीक्षण यासारख्या लेखनासाठी खालील माहितीपत्रकाद्वारे जरूर संपर्क करा.

टिप्पण्या