तो एक
अनामिक ध्यास असे
त्या
ध्यासाचा हर श्वास असे
श्वास
असे आभास असे
परी एक
आगंतुक आस असे !
तो एक अनामिक
ध्यास असे
त्या
ध्यासाची मज कास असे
कास
असे मनी वास असे
परी एक
निरंतर भास असे !
तो एक
अनामिक ध्यास असे
त्या
ध्यासाचा हव्यास असे
हव्यास
असे सहवास असे
परी एक
चिरंतन फास असे !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा