वेड मला
वेड मला जाईच्या नाजुकश्या गजर्याचे,
वेड मला संध्येच्या साजुकश्या नटण्याचे,
वेड मला गगनातील लुकलुकत्या ताऱ्यांचे,
वेड मला धरणीवर भिरभिरत्या वाऱ्याचे,
वेड मला रंगाचे, रंगातील संगाचे, संगातील भंगाचे वेड मला ...१
वेड मला रुणझुणत्या कंकणनिनादांचे,
वेड मला मिणमिणत्या दिपज्योतिकांचे,
वेड मला झुळझुळत्या जललहरीचे,
वेड मला सळसळत्या वेलपल्लविंचे,
वेड मला गाण्याचे, गाण्यातील तानेचे, तानेतील भानाचे वेड मला ...२
वेड मला रानातील झुलणाऱ्या सुमनाचे,
वेड मला कानातील रुळणाऱ्या कुजनाचे,
वेड मला शब्दातील भावूकश्या अर्थाचे,
वेड मला रसातील मार्मिकश्या स्मरणाचे,
वेड मला कवितेचे, कवितेतील यमकांचे, यमकातील गमकांचे वेड मला ...३
वेड मला मातेच्या ममताळू हद्याचे,
वेड मला तातांच्या कष्टाळू हातांचे,
वेड मला घरच्या या समईतील वातीचे,
वेड मला आज्जीच्या दुलईतील रातीचे,
वेड मला नात्याचे, नात्यातील बंधाचे, बंधातील छंदाचे वेड मला ...४
वेड मला मातीच्या पराक्रमी वीरांचे,
वेड मला संयमित निश्चयी धीरांचे,
वेड मला काळाच्या नकळत्या चक्राचे,
वेड मला भाळाच्या न मिटत्या रेषांचे,
वेड मला झिजण्याचे, झिजण्यातील जगण्याचे, जगण्यातील वेडाचे वेड मला ...५
-युवोन्मेष २००३

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा