नव वर्ष


घड्याळामागे धावता धावता सरलं वर्ष
चौकटीत फुल्या मारता मारता भरलं वर्ष
थेंब भर ज्ञान पेलता पेलता दमलं वर्ष
स्वप्नांचे इमले बांधता बांधता सजलं वर्ष
बरंवाईट पाहता पाहता मुरलं वर्ष
वाट पाहून थकता थकता झुरलं वर्ष
नव्या पहाटे नवीन होऊन उठलं वर्ष
नवे अनुभव घेण्या सुसाट सुटलं वर्ष

टिप्पण्या