सगळं तसं नेहमीसारखंच चालू होतं
या खांबावरून त्या खांबावर उड्या मारणं
या कोपर्यापासून त्या कोपर्यापर्यंत पळणं
समोर येणारे वेगवेगळे पदार्थ खाणं
कोणीतरी कधीतरी काहीबाही चौकशी करायला यायचं
सहज गप्पा मारून जायचं
पण फारसा काही बदल झालेला जाणवला नाही
असोत कोणीही आपल्याला काय करायचंय ..येतील जातील जाओत बापडे
आपण आपल्या नित्य टिवल्या भावल्या करून वेळ घालवावा
आणि पदार्थांच्या वाट्या फस्त कराव्या झालं
पण अचानक एक दिवस मात्र
सगळीकडून नुसते डोळेच डोळे बघायला लागले
आपलं काहीतरी चुकल्यासारखे
काय बदल झाला कोणास ठाऊक
नेहमीपेक्षा आजुबाजूचं सगळं जरा स्पष्ट दिसत होतं
ताकद वाढली होती पण वेग मात्र कमी झाला होता
मग अचानक कडकडाट ऐकू आला, टाळ्याच होत्या त्या
आजूबाजूला होते संशोधक नजर ठेऊन
जिंकल्याचा आनंद मनमुराद लुटणारे
तेव्हा लक्षात आलं
आपल्या नेहमीच्या वागण्यातला बदल अनुभवण्यासाठी
मुद्दाम निरीक्षण केलं जातंय आपलं
आणि समोर येणाऱ्या वाट्या म्हणजे काही नेहमीचा खाऊ नाहीये
त्यात पण सामावलेत कित्तीतरी अंदाज, निरीक्षणं आणि अनुमान
किती मूर्ख आहोत आपण
एवढा साध कसं नाही कळलं आपल्याला
कि आपण आपलं उंदीरपण केव्हाच गमावलंय
उरलंय ते गिनिपिग फक्त निष्कर्षासाठी जगणारं

ekdum jhakas
उत्तर द्याहटवा