मज लोभस हा इहलोक हवा

जगण्याची अतोनात इच्छा असावी तर बा भ बोरकरांसारखी,
स्वर्ग न मागता ते इहलोक मागतात, इथला हर्ष न शोक त्यांना हवासा वाटतो.
शंतनुचा मोह, ययातिचा देह न् पार्थाचा संदेह ते मागतात.
इंद्राचा भोग आणि चंद्राचा ह्रुद्रोग हवा असतो, सुखाची अपेक्षा करत असताना
दुःख दे आणि सोसायचे धैर्य दे म्हणून ते थांबत नाहीत तर दुःख सुद्धा त्याना हवं असतं.
मार्क्साचा अर्थ अणि फ्रॉईडाचा काम याबरोबरच गांधीचा राम हवा असंही
म्हणतात. दिव्याचा हव्यास धरत मानाव्याचा ध्यास मात्र सोडत नाहीत.
आता हे इतकं मागितल्यावर का एक जन्म पुरेल म्हणून आणखी चौर्यान्शित प्रवास हवा अशीही अपेक्षा ते करतात.

टिप्पण्या