स्मृति

जगण्याला सुरुवात कुठे झाली
विरहाची ही वेळ जवळी आली
श्वास अडला,भेट त्वरे सरली
परदेशास गाड़ी निघोनी गेली

झोप उडली, ड़ोळ्याशी नाही डोळा
तव स्मृति ही अश्रूत व्यूक्त झाली
हास्य ओठावर खोटे जरिही आणले
वेदनेला हृदयात दडविलेले

दिवस आले आणि कितिक गेले
मन स्मरणात अजुनि झुरताहे
किती ठरवून ही न सुचे काही
प्रेमाचिही दुनिया असे अनाम

हे लिहिण्या पान शाईत गुंतविले
परि ते ना शब्दात व्यक्त झाले
साहे न आता ताटातूटीत जीणे
उरले आयुष्य तुझिया मिठीत येणे

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा