माउली नाम

शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर आधारित कविता...

कष्ट साहिले, स्वप्नं पहिले
सोनसकाळी घरटे सजले...
गोकुळ भरले, शिवार नटले
आकाक्षांना धुमार फुटले...
आले वारे, गेले वारे
समृद्धीचे घन ओसरले...
मास ही सरले, अंकुर नुरले
ऋणाऋणाचे डोंगर झाले...
कंठ दाटले, झुकल्या मना
उमजे भुईचा निर्भय बाणा...
थकले नांगर, थिजले स्पंदन
आत्मघातकी विचारमंथन...
तत्क्षणी स्मरले माउली नाम
विरली छाया प्रकाश धाम
अपार शक्ति कणखर बाहूत
उभा राहिलो कसण्या अमृत

- युवोन्मेष २०१०

टिप्पण्या