शब्द होते सांधलेले, गीत होते बांधलेले
अंतरीच्या काळजाचा वेध होता घेतलेला
खेळ होता जीवघेणा , कळूनही केला गुन्हा । । १ । ।
सूर होते छेडलेले तान होती घेतलेली
स्वरलयींच्या कंपनाचा मेळ होता घातलेला
स्वप्न ते स्मरल्याविना , कळूनही केला गुन्हा । । २ । ।
डाव होता मांडलेला, जीत होती खेचलेली
उन्मादलेल्या गर्जनांचा माज होता चढ़विलेला
पट खेळुनी झाला जुना , कळूनही केला गुन्हा । । ३ । ।
भाव होता जोडलेला , जीव होता गुंतलेला
अर्थगर्भी स्पर्श आणि स्वार्थ होता साधलेला
स्मृती जागती पुन्हा पुन्हा , कळूनही केला गुन्हा । । ४ । ।
जन्म आहे जाह्लेला, चिन्तनाने गांजलेला
भार भूत भविष्य आणि वर्तमाना निसटलेला
पुसट त्या खाणाखुणा , कळूनही केला गुन्हा । । ५ । ।
nande mastach zhaliy.. samarpak shabda...
उत्तर द्याहटवा