एकदा म्हटलं मैत्रीसाठी वही पहावी करून
मैत्री आणि मुक्तछंद याचं नातं जवळचं त्यामूळे रकाने सहजच ठरले
मैत्रीला बंधनांच वावड, त्यामुळे कायदे आणि नियमांना नव्हता थारा
स्मरणातील पाने भराभर उलटली;
शाळेतल्या बाकापासून कॉलेजच्या कट्ट्यापर्यंत
रानातल्या भटकंतीपासून समुद्राच्या लाटेपर्यंत
पुस्तकातील पानापासून टीव्हीवरच्या कार्टूनपर्यंत
वेलीवरच्या फुलापासून पावसाच्या सरीपर्यंत
आगगाडीच्या प्रवासापासून कंपनीतील क्युबिकलपर्यंत
कंपासपेटीतल्या पेनापासून कोरया करकरीत जोड्यापर्यंत
यादी करताना गणिताची चांगलीच उजळणी झाली
जमेची बाजू भलतीच भक्कम न् खर्चाची बाजू रिकामीच होती
ताळेबंद मांडणार कसा ? एकमेकांशी तुलनाच नव्हती
चुटकीभर प्रेमावर पोतभर मायेचा नफा होता
न् मागता मिळालेली कोट्या न् कोटीची देणगी होती
वाटावाटी करताना नगद-उधारीची काळजीच नव्हती
वेळेबरोबर वाढत जाणारी मैत्रीची किमया सरस होती
तेजी असो मंदी असो ही श्रीमंती कायम होती.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा