माझिया बगिचात, होई रंगांची बरसात
स्वप्न बाबांचे सत्यात, उतरले ...१
माझिया बगिचात, डुले जास्वंदी गुलाब
लाडकोड आई त्यांचे, पुरविते ...२
माझिया बगिचात, रातराणी सुगंधली
दिनरात मोहरली, प्रेमभावे ...३
माझिया बगिचात, सदा पडे तगरीचा
लाजे चांदणे तयाने, आभाळात ...४
माझिया बगिचात, येती कमळाच्या ज्योती
ज्ञान-कलेची समृद्धी, त्यांच्यासवे ...५
माझिया बगिचात, हळदी-कुंकू कर्दळीचे
येणा-जाणाऱ्या सुखावे, नजरेने ...६
माझिया बगिचात, नागफणीचा दरारा
मनी येतसे जेधवा, तरातरा ...७
माझिया बगिचात, राहतसे मैना-रावा
बुलबुल सोबत चिमण्यांचा, येई थवा ...८
माझिया बगिचात, चाफा पानासवे बोले
याच दारी जन्मा यावे, बारा मासे ...९
माझिया बगिचात, झेंडू गेंद बहरला
साऱ्या सणांचा सोहळा, संजीवला ...१०
माझिया बगिचात, फुलारले सोने-चांदी
जेव्हा शिंपिले खत-पाणी, राजीवाने ...११
माझिया बगिचात, येतो आनंद माहेरा
संगे त्याच्या जीव माझा, सुखावला ...१२
स्वप्न बाबांचे सत्यात, उतरले ...१
माझिया बगिचात, डुले जास्वंदी गुलाब
लाडकोड आई त्यांचे, पुरविते ...२
माझिया बगिचात, रातराणी सुगंधली
दिनरात मोहरली, प्रेमभावे ...३
माझिया बगिचात, सदा पडे तगरीचा
लाजे चांदणे तयाने, आभाळात ...४
माझिया बगिचात, येती कमळाच्या ज्योती
ज्ञान-कलेची समृद्धी, त्यांच्यासवे ...५
माझिया बगिचात, हळदी-कुंकू कर्दळीचे
येणा-जाणाऱ्या सुखावे, नजरेने ...६
माझिया बगिचात, नागफणीचा दरारा
मनी येतसे जेधवा, तरातरा ...७
माझिया बगिचात, राहतसे मैना-रावा
बुलबुल सोबत चिमण्यांचा, येई थवा ...८
माझिया बगिचात, चाफा पानासवे बोले
याच दारी जन्मा यावे, बारा मासे ...९
माझिया बगिचात, झेंडू गेंद बहरला
साऱ्या सणांचा सोहळा, संजीवला ...१०
माझिया बगिचात, फुलारले सोने-चांदी
जेव्हा शिंपिले खत-पाणी, राजीवाने ...११
माझिया बगिचात, येतो आनंद माहेरा
संगे त्याच्या जीव माझा, सुखावला ...१२
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा