असो...............................!!!!!!!!!!!!!!!!!!

सर्वसामान्य माणसाच्या तोंडचा तद्दन गुळमुळीत उद्गार......!!!!
सदैव मान खाली घालून पांढरं निशाण हातात घेतलेला पवित्रा....!!!!

कितीही काहीही आणि कुठेही घोडचूक होताना दिसली तरी आपण सहज हा हतबल उद्गार काढून; चला
इथून पुढच्या पानावर असं म्हणून मोकळे होतो. घटना कुठलीही असो, उद्गार remains
constant.
म्हणजे काल संध्याकाळी आणलेली कांद्याच्या पात खराब निघाली
तरी असो आणि कालपरवा पर्यंत गळ्यात गळे घातलेले आपले मित्र-मैत्रिणी अचानक divorce
घेण्याचं
ठरवतात तरीही असोच!!!
मला गेल्या आठवड्यात एक असाच अनुभव आला, म्हणून खरंतर हे
असलं काहीतरी लिहीलं जात आहे ...असो ...
माननीय पूज्य महादेव ऑटो सर्व्हिस सेंटर , सदाशिव पेठ, पुणे
३० यांच्या सत्क्रृपेमुळे मला सात्विक संताप म्हणजे काय त्याची जाणीव झाली.
मी माझी २ व्हीलर यांच्याकडून खरेदी केली आहे, TVS
distributor असतात ते. गाडी घेतली तेव्हा त्याबरोबर साधारणतः २ वर्ष
सर्व्हिसिंग मिळण्याची सोय होती, दर ३ महिन्यानी एकदा, किंवा काही ठराविक रनिंग
झाल्यानंतर गाडीचे सर्व्हिसिंग करून मिळणार.
त्या बुकलेट मध्ये दिल्याप्रमाणे दीड वर्ष सर्व्हिसिंग करून
घेतलं. शेवटच्या ५ सर्व्हिसिंग मध्ये एकाडेक paid सर्व्हिसिंग होतं. ऑगस्टमध्ये
गाडी घेऊन गेले तर मला सांगितलं गेलं की गाडी ओके आहे, सर्व्हिसिंगची आवश्यकता
नाही, आणि रनिंग पण विशेष झालेले नाही त्यामुळे हे सर्व्हिसिंग पुढच्या वेळी करू.
गाडी काही कुरबुर करत नव्हती, त्यामुळे मी पण निश्चिंतपणे
गाडी घेऊन उलटी फिरले. ३ महिन्यानंतर पुन्हा सर्व्हिसिंग साठी गाडी घेऊन
महादेवाच्या दारात उभी होते. महादेवाने गाडी घेतली पण नवीन डाव टाकला, गेल्या वेळचं
सर्व्हिसिंग फ्री होतं यावेळचं नाहीये, आणि पेड सर्व्हिसिंग केलेलं असेल तरच इथून
पुढची फ्री सर्व्हिसिंग मिळतील. बुकलेटवर होतं तसं लिहीलेलं. फ्री होत तेव्हा बरी होती
गाडी आणि आता बरोब्बर काहीतरी झालेलं असणार ...असो... सर्व्हिसिंग करून मिळणार हाच
काय तो फायदा.
आता भुर्दंड सहन करून केलेलं सर्व्हिसिंग तरी चांगलं असावं
तर ते पण नाही, गाडी अनेक नवीन चमत्कार दाखवत होती आणल्यानंतर, ब्रेक लावल्यावर
जवळपास पूर्ण गल्लीला कळत होतं की ही गाडी रस्त्यावर आहे, ......३ दिवसात परत
न्यावी लागली गाडी सर्व्हिसिंगला....
वाचताना पुन्हा पुन्हा हा शब्द बघूनही त्रस्त होईल माणूस
माझं तेच तेच करून काय होत असेल ...असो ......
तरीही मी पुन्हा गाडी सर्व्हिसिंग साठी घेऊन गेलेच
मार्चमध्ये ....कोकणस्थी वळण हे असं असतं ....फुकट मिळेल एक तरी सर्व्हिसिंग या
आशेवर ......पण आता म्हाद्याने एक आणखी नवीन trick काढली ....
काय तर एखादं जरी सर्व्हिसिंग केले नसेल तर पुढचं कुठलंच
सर्व्हिसिंग फ्री मिळणार नाही. म्हणजे हा प्लान ऑगस्टमध्येच ठरलेला होता........ कहर.............
काय करणार ...तिथे असलेल्या आजूबाजूच्या एखाद्या तरी गाडीला
थोडी तरी हानी पोहोचवूया अशी इच्छा झाली पण लगेचच कोणीतरी माझ्यासारखंच बिचारं
पात्र असेल म्हणून मी तो विचार सोडून दिला ...विशेष चर्चा, वाद किंवा भांडण यासारख्या
फालतू गोष्टी करायला वेळ नव्हता .......त्यामुळे या वेळी मात्र गाडी तिथे न ठेवता
परत घेउन आले.
येताना उरलेली ३ सर्व्हिसिंग...आता सगळी पेड आणि तीही नवीन
मेकॅनिक शोधून घ्यायची आहेत हे दिसत होतं ....आपण शुध्द बिनडोक आहोत..सहजी फसलो ..
हे राहून राहून वाटत होतं ......तशीच तडक घरी निघाले, गाडी लावतानाच शेवटचा उद्गार
आलाच तोंडून ...असो......चाफेकर, टिळकाचे आदर्श सोडून आपण हे ‘असो’ धोरण का पत्करत
आहोत याबद्दल मात्र अजून वाईट वाटतंय .......

टिप्पण्या