क्षणा आजच्या तू


कर्तव्य मानून कर्मे क्रमिली
फळे नित्य वैताग साऱ्या प्रसंगी
जीवा दु:खं मानू नको त्या कृतींचे
दुःखे तुझी ती नशिबाच्या नशिबी

कधी काय कोठे नि कैसे करिशी
उद्याचे भय नेई निद्रा लयासी
जीवा सत्वरी सोड चिंता उद्याची
कधी काळ दोन्ही न् जातील संगती

मनस्वीच बुद्धी मनस्वीच वाचा
जये कल्पिती सार अविचार साचा    

जीव घोर वाहू नको जीवनाचा
सुखाचे नि संगे पुढे चाल आता                       
मानसा मोहरिले स्मरोनि सुखाला  
क्षणा आजच्या तू जागविले जीवाला  

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा