जगात पाणी, ढगात पाणी, वाफेमध्ये पाणीच पाणी
जंगलात पाणी, डोंगरात पाणी, समुद्रामध्ये पाणीच पाणी
इकडून पाणी, तिकडून पाणी, सगळीकडे पाणीच पाणी
भूगोलात पाणी, शास्त्रात पाणी, पाण्यावरती कितीक गाणी
गणितात पाणी, मराठीत पाणी, हिस्ट्रीमध्ये आणीबाणी
इकडून पाणी, तिकडून पाणी, सगळीकडे पाणीच पाणी
शहरात पाणी, दारात पाणी, पायपाम्ध्ये पाणीच पाणी
रस्त्यात पाणी, खड्ड्यात पाणी, डोळ्यामध्ये पाणीच पाणी
इकडून पाणी, तिकडून पाणी, सगळीकडे पाणीच पाणी
बंगल्याला पाणी, गाडीला पाणी, बागेमध्ये पाणीच पाणी
टाकीत पाणी, पिंपात पाणी, बाटलीमध्ये पाणीच पाणी
इकडून पाणी, तिकडून पाणी, सगळीकडे पाणीच पाणी
मुळशीत पाणी, अम्बीत पाणी, लवासामध्ये पाणीच पाणी
रंगायला पाणी, डुंबायला पाणी, शेतीसाठी नाहीच पाणी
इकडून पाणी, तिकडून पाणी, सगळीकडे पाणीच पाणी
धरणात पाणी, स्मरणात पाणी, पाण्यासाठी कितीक नाणी
स्वप्नात नाणी, नाण्यात पाणी, पिण्यासाठी नाहीच पाणी
इकडून पाणी, तिकडून पाणी, सगळीकडे पाणीच पाणी
(Shikshanvivek Feb 2015)
(Shikshanvivek Feb 2015)
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवा