ढ क ल..............


आईनी परवा नवा मोबाईल घेतला. मी सपासप तिला वेगवेगळे अॅप्स डाउनलोड करून दिले. आईला शिकवायची संधी कुठली सोडतेय मी....तर त्यात एक होतं whats app. तिला कमाल वाटली wifi काय... हे सुटसुटीतपणे करता आलेलं मेसेजिंग काय..कमालच सगळी...आई खुष. हळूहळू तिची एकेक करत whats app group मध्ये entry झाली..शाळेतले विद्यार्थी, मैत्रिणी, काहीतरी कामानिमित्त तयार झालेला गट, जुन्या शाळेतले मित्रमैत्रिणी, आमची नवी भावंडे ...आता ती नवी कशी?...होती जुनीच पण भेट नाही संवाद नाही त्यामुळे whats app वर भेटल्यावर अचानक नव्याने ओळख व्हावी तितकी नवी कोरी करकरीत ...याला लोक प्रत्यक्षात भेट होत नाही त्यामुळे हे माध्यम किती उत्तम आहे असा एक निकष लावतात...असो ...हे वैयक्तिक मत झालं....

तर,....एक दिवस ती मला म्हणाली ..कोणीतरी पाठवलेली कुठलीतरी image दाखवत ..या images कायम अशाच असतात ...कोणाच्या कुठल्या ..अशा प्रश्नांची उत्तर न देणाऱ्या.....बघ हे किती छान केलय न वगैरे वगैरे...वाह ..म्हणाव असं होतच ते....पण मी तिला सहज म्हणाले ..सगळ्या images बघतेस की काय तू...? अग त्या काही प्रत्येकाने स्वतः तयार केलेल्या, लिहिलेल्या, काढलेल्या नसतातच मुळी...नुसत्या forward केलेल्या अर्थात ढ क ल ले ल्या असतात .....

जरा बरा वाटला विनोद की ढकल ...यात प्रत्येकाची बुद्धिमत्ता सारखीच असते असं आपण गृहीत धरू ..कारण प्रत्येकाच्या आवडीनिवडी आणि स्वभाव वेगवेगळे असतात ..तर मग सगळे messages सगळ्यांना पाठवले जातात याचा अर्थ प्रत्येकचं किमान आकलन तरी समान असायला हवं ...असो हा मुद्दाही व्यक्तीनुसार बदलत जाणार ...हं...तर जो कोणी खरा कवी, खरा चित्रकार...किवा आणखी काही आहे त्याला त्याचं हे शब्द चित्र धन जगभर पसरलेलं कळत तरी असेल का ...हा एक प्रश्न ...त्याचं कौतुक तर सोडाच पण किती जास्त प्रमाणात copy होऊन स्वत:च्या नावावर खपवलं जात असेल याला काही गणतीच नाही......आधी हे सगळं mail मधून पसरत होत आता अनंत sites च्या माध्यमातून apps मधून घडतय...सध्या कोण कुणाला काय कशासाठी किती कुठे आणि कसं share करत सुटलेलं आहे नेम नाही ...आणि का याचं कारण काहीही असू शकत ....goodmorning, goodafternoon पासून ते timepass सहज ...पर्यंत. नायगावकरांची कविता पाडगावकरांची होते ...भारताची निवडणूक असू दे नाहीतर match..प्रत्येकाला..मला काय वाटत हे पोचवण्याची घाई....अरे ..तू निकाल तरी बघ नाहीतर खेळ तरी...पण नाही ते whats app बिचार अखंड पिंग पिंग पिंग करत असत...हो याला वेळ काळ याचं बंधन अज्याबात मन्जे अज्याबात नाही....हो कारण जागतिकीकरण ....the world is flat...पण पृथ्वी नशिबाने तिच्या गतीने चालू दिलेली आहे त्यामुळे वेळ काही झालं तरी प्रत्येक देशाची निरनिराळीचं राहणार... नाहीतर तिलाही हवी तशी ढकलून द्यायला आजचा माणूस मागेपुढे बघणार नाही
या ढकलून देण्यावरून एकदम साक्षात्कार झाला....की आपण किती messages ढकलून देतो....बोटाला सध्या हेच महत्व्वाच काम आहे....कारण त्या message मधून मिळणारी माहिती प्रत्येकवेळा आपल्यासाठी म्हणून पाठवलेली, आपल्या आवडीची नसते आणि  गरजेची तर मुळीचच नसते.....मग या माहितीच्या युगात हा जो माहितीचा प्रचंड पूर आलाय त्याला सामोर जायचं तरी कसं ...आता हा आणखी एक विचित्र प्रश्न....

असो ...पूर्वीचा माणूस मोबाईल नसताना अधिक शांत आणि सुखी असावा एवढं निश्चित

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा