(whatsapp नावाचं एक विध्वंसक app वापरणाऱ्या दोन व्यक्ती
एकमेकांशी बोलत आहेत. एक दिवस कोण, कोणाला,
कधी, काय, किती खरं आणि खोटं बोललं यावरून त्यांचा झालेला हा सु?संवाद. अर्थात हा संवाद
video call वर घडतोय....समोरासमोर ....या दोघांचं वय अनुक्रमे २५ आणि ५०
वर्षे....नातं काय असावं बरं.. वाचताना तुमच्या मनात येईल ते)
२५: मी सकाळीच मेसेज केलाय ..happy anniversary...
५०: मला नाही मिळाला मेसेज
२५: बघा नीट ...केव्हाच केलाय ...तुम्हाला वेळ असेल तर फोन करून बोलू
का असं पण विचारलं होतं..
५०: हो का? मी वाचला नाही.
२५: आहा! घडला न प्रमाद!!
५०: काय? कसला प्रमाद?
२५: सगळ्यात आधी, खोटं बोलणं हा गुन्हा
आहे. दुसरी गोष्ट समोरच्याला कळू न देता तरी बोलावं ना हे खोटं ...असं धडधडीत समोर
बोलणं ही भयानक मोठी चूक आहे. त्यामुळे समोरच्याचा तुमच्याबद्दल आदर संपून जातो
आणि उरते ती केवळ केविलवाणी सहानुभूती!
५०: खोटं काय त्यात...खरच मिळाला नाहीये
मेसेज
२५: आवरा आवरा...आता तरी शहाणे व्हा. ही
ही सगळी app वापरता येतात म्हणून शेफारून जाऊ नका ही app तुम्हाला नीट कळली आहेत
का ते पहा....
५०: हो काय झाल न कळायला...५-६ वर्ष झाली
आता हा smart phone वापरून
२५: तेच तर ...पण तुम्ही smart कुठे आहात?
५०: बास!! आता स्पष्टीकरण ..?
२५: स्पष्टीकरण...ते तुम्ही देणार आहात
मला...कारण ...whats app वरून मला हे सगळं कळत की तुम्ही शेवटचं ते app चेक कधी
केलंय...किती वाजता.....तुम्हाला माझा मेसेज मिळाला आहे का..किती वाजता....आणि
तुम्ही माझा मेसेज वाचला आहे का ...किती वाजता ......आता हे सगळं जर मला माहीत
असेल तर तुमचं ‘माझ whats app चालू नाही’ किंवा ‘मी ते बघितलेलं नाही,’ ‘मला मेसेज
मिळाला नाही.’, ‘मी मेसेज वाचला नाही.’ असलं काहीतरी बोलणं सपशेल खोटं नाही का?
५०: ओह बर सॉरी
२५: बास संपलं?
५०: हो मग काय?
२५: तुम्हाला माहिती आहे का..ही किती
विचित्र गोष्ट आहे ....वाचता ते वाचता आणि reply देत नाही? slide करून वाचता न
unread ठेवता .. हे लाजिरवाणी गोष्ट आहे अहो...
५०: हो पण हे काही कोणी मुद्दाम करत नाही....एवढा
विचार कशाला करायचा?
२५: असो ते काहीही ...पण या वागण्यामुळे
गैरसमज निर्माण होऊ शकतो ...त्यामुळे तुम्ही हे वागणं बदलायला हवं
५०: ok ..आता ते कसं तेही कळू द्या ...
२५: २ option आहेत ...पहिला: जो तुम्हाला
जमणार नाही ....खरं बोलायचं...आणि दुसरा: निदान settings करायला
शिकायचं ज्यामुळे तुमचं हे वागणं तुम्ही लपवू शकाल आणि तुमचं खोटं जगाला खरं
वाटेल....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा