मनाची समजूत काढलेली
आहे कायमचीच; शिकवूनच ठेवलंय त्याला,
बिनधास्त विश्वास
ठेव आनंदावर आणि घे जोरात टाळी.
काळजीच नको, याच
जन्मात सुटणार आहेत चिंतांची जाळी.
हं ,
उगीच भीतीच काहूर-बिहूर म्हणून सहानुभूती मिळव.
पण
किंचित समाधान सोबत घेऊन सुखाच्या कल्पनाही रंगव.
अगदी रडावंसंच
वाटलं तरी लाज वाटण्यासारखं काही नाही.
उगीच कोणी पाहिल
म्हणून आपलं दाटणं थांबवायचं नाही.
लक्षात ठेव, उगीच जास्त अपेक्षा-बिपेक्षा करू नकोस.
केल्यासच जरी चारचौघात बोलून-बिलून
दाखवू नकोस.
स्व्प्नामधले सगळे
रंग प्रत्यक्षात आणायचा जरूर प्रयत्न कर.
पण त्यामुळे मनाचा
कोरेपणा व्यापला जाईल हे मात्र विसर.
खूप वर्ष झाली संस्कारांना आता मनही रूळलंय.
कधी
कुठे कसं वागायचं त्यालाही कळलंय.
भावनांचं
मोजमापही अगदी अचूक जुळलंय.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा