माझ्या मनाच्या मैफिलीत,
किती आळविले राग, किती गायल्या रागिण्या
किती गायल्या गवळणी, किती गायल्या विराण्या...
माझ्या
मनाच्या चित्रफलकावर,
किती
रेखाटली चित्रं, कित्ती वापरले रंग
आभाळातल्या अभ्रांचे अनंत तरंग
माझ्या
मनाच्या बागेत,
किते
लाविली झाडं, किती बहरली फुलं
सायली,
चमेली, निधीगंध-पारिजातकाचा दरवळ
माझ्या
मनाच्या नदीप्रवाहात
कल्पनांच्या
होड्या, भावनांच्या बोटी
डोलत,
हालत जातात, कधी घडतात गाठीभेटी
माझ्या
मनाच्या आकाशात,
चंद्र,चांदण्या
नक्षत्रांनी भरलेली आकाशगंगा
या सर्वांच्या मोहातून कशी सुटू पांडुरंगा?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा