भ्रम

नवीन वाट माझी, नवीन किनारा
इथे मज लाभला, प्रसन्न निवारा

नव्या या जीवनी जाईन गुंगून
अध्यात्म जीवनी जाईन रंगून

सद्भावासवे जाता खोल अंतर्यामी
चिती माझ्या उसळल्या  अनंत आनंदाच्या उर्मी

वाटले क्षणैक जाऊ नये कोठे
शांत मन आता झाले रिते रिते

संपले मन माझे संपला हा खेळ
आणि मज कळले हाही मनाचाच खेळ

- उषा पेंडसे

टिप्पण्या