शाब्दिक दिवाळी,
सांगीतिक दिवाळी, पौष्टिक दिवाळी तशीच
एक भौमितिक दिवाळी.
कंपास, कर्कटक, कोनमापक, सहा
इंची पट्टी, टोक केलेली गुळगुळीत शिसाची पेन्सिल, खोडरबर, सोबत कागद म्हणजे दिवाळी. समांतर रेषा,
त्रिकोण, चौकोन, पंचकोन, लंबदुभाजक, कोनदुभाजक,
आंतरवर्तुळ यांनी सजलेलं टेबल म्हणजे दिवाळी. x आणि y यांच्याबरोबर z ऍक्सिसने दुपारभर सहजपणे ५,३,२, खेळायला येऊन बसावं ती दिवाळी. द्विमितीतली
आकृती(2D) त्रिमितीत(3D) बदलुन जाते; घन,
शंकू, तीन/चार
बाजूंचा पिरॅमिड असे वेगवेगळे आकार समोर येताना दिसणं म्हणजे दिवाळी.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा