भूलविलेस साजणी, शब्दरूप घेउनी|
रेखिलेस मन्मनी, चित्र एक कांचनी|
प्रतिभेच्या अंगणी, शिंपीलेस मुक्तमणी|
पारीजातासम विखुरली, मुक्त पोवळी गुणी|
सुगंधात नाहिले, सौदर्यात वाहिले|
शब्द तुझे अर्थासह, माझ्या मनी नाचले|
फेर धरुनी नाचता, एक चमकली परी|
तुझिया रूपे जणू, शारदाच अवतरली|
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा