प्रिये चहा, रात्रीचा समय सरता दे तू बेड टी मला.... प्रिये चहा
आल्याचा वास सुटत दालचिनी नाममात्र
निद्रा मम दूर करत हाती हवे चहा पात्र.....प्रिये
चहा
बाल्कनीत खूर्ची उभी मोबाईल निवांत जगी
रविवासर संपल्याची जाणीवही जावो लया....प्रिये
चहा
आळसात पसरुनिया गेला जो वेळ अहा
स्थिती मम ही बदलाया उठलो की पुन्हा चहा...प्रिये
चहा
छान विडंबन. प्रिये पहा... च्या चालीशी तंतोतंत जुळणारे.
उत्तर द्याहटवा