असते तरी....नसतेच


चेहऱ्याला नाव असते, पण नावात काहीच नसते
गाण्यात सम असते, पण समेवर गाणेच नसते

शास्त्राला नियम असतो, पण नियमाला शास्त्रच नसते
पाणी हेच जीवन असते, पण पाण्याला चवच नसते

विचारांना म्हणे गती असते, पण गतीला विचारच नसतो  
रंगाचे मूळ पांढऱ्यात असते, पण पांढरा मुळी रंगच नसतो  

दाहीदिशांना वाट असते, पण जगण्याला दिशाच नसते
स्वप्न वास्तवात असते, पण स्वप्नात वास्तव मुळीच नसते

प्रत्येक नाटकात आयुष्य असते, पण आयुष्यात नाटकच नसते
प्रत्येकाला इतरांची गरज असते, पण को ss णी कोणाचे नसते 

टिप्पण्या