एका अशाच उनाड
दिवशी ढग पडला होतं सुस्त
हलत नव्हता
डुलतही नव्हता दिसला जरी चुस्त
वारा सुसाट फिरत होता स्वतःच्या नादात
मस्त
बेफाम उधळत पानं न माती पसरत त्याचे
हस्त
ढकलून देत ढगाला
म्हणाला, ‘तू ठिसूळलेलं जस्त’
गोंधळत ढग गरजला,
‘तुला हे पडणार नाही स्वस्त’
जमिनीवरची पानं सळसळली, ‘ह्याला जरा
नाही शिस्त’
झडझडून येणाऱ्या पावसावर त्यांची सगळी
भिस्त
झटकत अंग माती
म्हणे, ‘काही बिघडलं नाही जास्त’
चैतन्य आलं
सृष्टीवर वाऱ्याचं वागणं आहेच रास्त
वारा परत घोंघावला पाहून सूर्याचा
होणारा अस्त
हवी असो किंवा नसो माझी अंखड चालू
राहे गस्त
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा