बरं झालं आज तू स्वत:च हा विषय काढलास
कारण आहे म्हणत जीव टांगणीवर लावलास...
एकदाच काय ते सांगून टाक हो नाही काय ते
दररोज काय तुझ्यासाठी मी नव्याने झुरायचे....
पुष्कळ दिवस झाले भेट होते आहे की आपली
उगीच का ती जुई मी इतके दिवस जपली....
पुरे झाला दिशाहीन प्रवास तुझ्या तिरक्या प्रश्नांचा
विश्वास ठेव माझ्यावर उत्तरावर ठेवतेस जसा....
बदलणार दोघे आपण काळ जसा बदलेल
तुला पटलेला आजचा मी कदाचित उद्या नसेन....
भीती शंका काळज्या तुझ्या जराशा तरी दूर ठेव
सुंदर स्वप्न तुझं-माझं रंगण्यासाठी वेळ ठेव...

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा