संस्कृत जसजसं शिकायला सुरुवात केली, देव वन आणि माला हे जेव्हा भेटले आणि तोंडपाठ झाले तेव्हा मजा यायला लागलीच. पण खरं पाहता संस्कृत लहान असताना अथर्वशीर्ष आणि रामरक्षा या दोन स्तोत्रांमधून भेटलेलं होतच की. अर्थात त्याचा अर्थ काय किंवा असंच का म्हणायचं असले प्रश्न विचारले नाहीत, शुद्ध घोकंपट्टी आणि उगीच नाही म्हटलं तर बाप्पा रागवेल की काय असल्या भीतीपोटी केलेलं ते पाठांतर. जेव्हा विभक्ती प्रत्यय शिकले आणि गणेशस्य किंवा गणेशाय म्हणजे गणेशाचे किंवा गणेशाला वगैरे म्हणायचं आहे बाकी विशेष काही नाही हे कळलं.
या संस्कृत श्लोकांनी शुध्द आणि स्पष्ट बोलण्याचे जिभेवर केलेले संस्कार आजन्म मदतीला राहतील. सुभाषित म्हटलं की मनात कितीतरी श्लोक रुंजी घालू लागतात. अशाच देव त्यावरची श्रद्धा, भक्ती यांना उल्लेखून रचलेली कित्येक सुभाषित आहेत. त्यापैकी हे सुभाषित खूप सोप्पं आणि कायम लक्षात राहील असं.

आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरम्|
सर्वदेव नमस्कार: केशवं प्रतिगच्छति|
आकाशातून पडणारे पाणी जसे अखेरीस समुद्राकडे जाते, तसेच सर्व देवांना केलेला नमस्कार हा केशवाला म्हणजे विष्णूला मिळतो. थोडंसं पुढे जाऊन आपण म्हणूया, कोणत्याही देवाला केलेला नमस्कार हा एकाच देवाला पोहोचतो कारण देव एकच असतो. त्याच्याकडे बघणाऱ्याची दृष्टी फक्त निरनिराळी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा