अगदी लहानपणापासून आपण जसजसं झाडं, पानं, फळ-फुलं, निरनिराळे प्राणी आणि पक्ष्यांची ओळख करून घेत असतो तसतशी आपली निसर्गाशी ओळख होऊ लागते. निसर्गाचा अभ्यास हा विज्ञानाइतकाच किंबहुना त्याहूनही गहन असतो. आपल्याला साध्याशा वाटणाऱ्या गोष्टीच्या मागे
खूप मोठा अर्थ सामावलेला असतो. उदाहरण घ्यायचं झालं तर असं पाहा; निसर्गात विविधरंगी पशुपक्षी दिसून येतात. काही पशुपक्षी नुसते रंगीत असतात असे नाही तर ते त्यांचे रंग बदलूही शकतात. आता असं का बरं घडत असावं? अर्थातच त्याची कारणे वेगवेगळी असतात. याप्रकारे भ्रामक रंग घेताना किंवा जाहिरात करण्यासाठी वा आकर्षून घेण्यासाठी स्वत:चा रंग बदलताना निसर्गात दिसून येणाऱ्या काही पशुपक्ष्यांबद्दल आपण उदाहरणांसह माहिती करून घेऊ.
भ्रामक रंग वापरून शिकार किंवा भक्षक यांना फसवले जाते. क्लुप्ती करून किंवा स्वत:चा रंग त्यांच्या परिसराशी साधर्म्य दाखवणारा असावा असा प्रयत्न करून पशुपक्षी स्वत:चे संरक्षण करतात किंवा धोक्याची सूचना देतात. जसे वाघाला उंच गवतात लपून राहण्यासाठी त्याच्या अंगावरील पट्ट्यांची मदत होते व त्याच्या अंगावर, गवतावर पडणाऱ्या उजेड व सावली यामुळे तो त्याच्या शिकारीला फसवू शकतो व त्याला सहज शिकार मिळू शकते. त्याचप्रकारे चित्ता किंवा बिबट्या त्यांच्या अंगावरील ठीपक्यांमुळे उंच गवतात किंवा जंगलातील परिसरात दडून राहिले असता दिसू शकत नाहीत. आपल्याला वाटेल की झेब्रा हा प्राणी दिसणे सहज शक्य असेल पण झेब्रा हे सिंहाचे भक्ष आहे व सिंह साधारणत: रात्रीच्या वेळी शिकारीला जातो त्या वेळी झेब्रा उंच गवतात लपला असता त्याच्या अंगावरील चट्टेपट्टे त्याची आकृती स्पष्ट होउ देत नाहीत व ते स्वत:चे रक्षण करू शकतात. पांढऱ्या अस्वलासारखे काही प्राणी आर्क्टिक हवामानात टिकून राहण्यासाठी त्या रंगाचे बनलेले असतात.
जाहिरात करण्यासाठी /आकर्षून घेण्यासाठी रंग बदलणे हे देखील काही पशुपक्ष्यांचे असेच एक वैशिष्ट्य आहे ज्याचा उपयोग करून ते मादीला आकर्षून घेऊ शकतात. पक्ष्यांमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते. जसे मोर हा लांडोरापेक्षा अधिक विविध रंगानी सुंदर बनलेला पिसारा धारण करतो ज्यामुळे तो पांढऱ्याशुभ्र लांडोराला आकर्षून घेऊ शकतो. कोंबड्याच्या डोक्यावर असणारा तुरा आणि गडद रंग कोंबडीला नसतो. बर्ड ऑफ पॅरेडाईज (स्वर्गातील पक्षी) या नावाने ओळखले जाणारे नर पक्षी तर खूपच सुंदर असतात. निसर्गात चालू असणाऱ्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी पक्ष्यांना त्यांच्या रूपाचा असा उपयोग करून घेता येतो. काही फुलांचेही रंग असे असतात जे फुलपाखरांना त्यांच्याकडे आकर्षून घेतात ज्यामुळे परागीकरण होण्यास मदत होऊ शकते. विशिष्ट प्रकारची बेरीची फळे इतकी गडद रंगाची असतात की पक्षी त्यांच्याकडे सहज आकर्षून घेतले जातात व ती फळे खाऊन त्या बियांचे त्यांच्यामार्फत परागीकरण होऊ शकते.
अशाप्रकारे नैसर्गिकरित्या निवड करताना रंगांच्या सहाय्याने आकर्षण, निसर्गातील सातही रंग शोभून दिसतात ते त्यात जपलेल्या संतुलित भ्रम किंवा धोका उत्पन्न करू शकणारी ही प्रक्रिया किती प्रभावी असू शकते हे यातून दिसून येते. शास्त्रशुध्द परस्परसंबंधामुळे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा