सध्या माझा मुलगा
चित्राच्या पुस्तकाकडून गोष्टीच्या पुस्तकाकडे वळतोय तसतसं लहान मुलांसाठी पुस्तकं
शोधण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुक वर एका मैत्रिणीने
शेअर केलेली पीडीएफ मिळाली. पुस्तक होतं 'देनिसच्या गोष्टी’. मूळ पुस्तक रशियन
भाषेत असून त्याचे मूळ लेखक आहेत विक्टर ड्रागुन्स्की. त्याचा मराठी अनुवाद केला
आहे अनिल हवालदार यांनी.
अतिशय गोड पुस्तक.
अर्थातच त्यातली पहिली गोष्ट वाचली आणि मग ते पुस्तक पूर्ण वाचून झाल्याशिवाय बाजूला
झालं नाही. ही गोष्ट होती ‘मला काय आवडतं’ अगदी आपल्या सगळ्यांना लहानपणी काय आवडत
होतं , आता आपल्या मुलांना काय आवडतं याचा प्रत्यक्ष अनुभव.
देनीसला ठोकठोक करायला
कापाकापी करायला आवडते, मोssठ्या आवाजात ओरडायला आवडतं. मी आणि माझा मुलगा दोघं वाचत
होतो. हळूच कन कान टवकारले गेले, माझ्या जवळ येऊन मग हो, आणखी काय आवडतं देनीसला?
मग त्याला हत्तीचं पिल्लू विकत घ्यायला आवडेल म्हटल्यावर तर परमानंद. ‘जेव्हा मी
लहान होतो’ या गोष्टीत आई गोष्ट सांगतेय, एकीकडे घास भरवणं चालू त्यामुळे, हा,
पुढचा घास खा, चाव नीट म्हणत म्हणत गोष्ट पुढे सरकत असते हा तर आमचा रोजचा अनुभव.
त्यांनतर होती वर्गासमोर गाणं म्हणण्याची गोष्ट आणि त्याची आणि त्याच्या मित्राची
झालेली फजिती. मग मित्राला काहीतरी टोपण नावाने हाक मारत अंतराळात फिरायला
निघालेली देनीस न मिष्काची जोडगोळी आणि सध्याचे निन्जा टर्टल आणि बॅटमॅन सुपरमॅन
चे केप घालून घरभर भटकणारे आपण; हे पाहून देनीसशी खरी गट्टी जमली. ‘नजर ठेवणारी
दुर्बीण’ म्हणजे चुकीची गोष्ट करत असताना ‘आई बघतेय की नाही हा कानोसा घेतला जातो’
तीही आठवण झाली. छू मंतर करून अंगठा गायब करून दाखवणारा त्याचाही बाबा म्हटल्यावर
गंमतच वाटली आणि ‘दीडशहाणा प्रोफेसर’ वाचल्यावर आईबाबांनाही माहित नाही ते मला
माहित असतच की; आई, तुला कुठे माहितेयत सगळ्या निन्जा टर्टलची नावं किंवा कुठे
माहितीये स्काय कोण असते पॉ पट्रोल मध्ये. पोहण्यात तिसरा नंबर वाचताना पहिले दोघं
आणि उरलेल्या वीस पंचवीस जणांचा तिसरा नंबर म्हणून मनापासून आनंद झाला. ह्या आणि
आणखी उरलेल्या सगळ्याच गोष्टी आवडल्या.
कलिंगडाची गल्ली
वाचल्यावर खूप प्रश्न पडले. लहान मुलाला काकांनी कलिंगड देऊन टाकलं असेल, खूप थंडीमुळे
खायला काहीच मिळालं नसेल. अशा कित्येक जाणीवांची ओळख झाली. थोडं आश्चर्य, थोडं वाईट
वाटलं पण आणखी वाचायची ईच्छा होतीच.
‘निळ्या आकाशात लाल फुगा’
या गोष्टीत एक वाक्य होतं, हा लहानसा देनीस त्याने जत्रेतून विकत घेतलेला एक फुगा
आपणहून आकाशात सोडून देतो. मैत्रिणीला तो हवा असतो; ती का सोडून दिलास असं विचारते. तेव्हा देनीसला फुग्याकडे
बघताना वाटतं की त्या फुग्याला असंच संथपणे उंच उंच उडत वर वर जाण्याची आयुष्यभराची
ईच्छा असणार. असा एखादा निरागस पण विचारी देनीस तर ‘तो जिवंत आहे आणि चमकतोय’ या कथेत
आईची वाट बघत घराबाहेर बसलेला असताना त्याचं अगदी आवडतं खेळणं एका जिवंत
काजव्याच्या बदल्यात त्याच्या मित्राला सहज देऊन टाकतो. मग जरा वेळाने जेव्हा
आई येते तेव्हा मात्र टचकन डोळ्यात पाणी येतं आणि आनंदही होतो देनीसची आई आल्याचा.
आयुष्यातले असे किती
हलकेफुलके क्षण मोठेपणी आपल्याला माणूस बनवीत असतात.
एक सुंदर पुस्तक, जरूर वाचावं
असं. वाचक म्हणून, लहानपणची आठवण म्हणून, एक आई म्हणून आणि आई-मुलाचा एक सुंदर
संवाद होण्याचं एक माध्यम म्हणून.
क्ऱूपया मला PDF पाठवाल का?
उत्तर द्याहटवाsmita.deshmukh.22.12.87@gmail.com . येथे PDF पाठवाल का?
उत्तर द्याहटवाSoviet Literature in Marathi
हटवाhttps://drive.google.com/.../0B6QdKq6q5WvFYldoNVFoakRSS0k...
देवदत्त राजाध्यक्ष यांचा फेसबुक वर एक ग्रुप आहे, त्यावरून ही PDF मिळू शकेल.
मला देखील pdf हवी होती. कृपया पाठवाल का?
उत्तर द्याहटवाSapkalebhavika@gmail. com
हटवाSoviet Literature in Marathi
हटवाhttps://drive.google.com/.../0B6QdKq6q5WvFYldoNVFoakRSS0k...
देवदत्त राजाध्यक्ष यांच्या फेसबुक ग्रुप वरुन या पुस्तकाची PDF मिळू शकेल.