नवऱ्यामुलीची बायको होते, गृहिणी होते......... तोवर सगळं ठीक असतं
गृहिणीची भांडेवाली होते, तेव्हा गणित चुकतं!
आपल्या मुलांत आपले रूप, गुण पाहात असतो......... तोवर सगळं ठीक असतं
आपली पोरं म्हणजेच आपण असं जेव्हा वाटू लागतं, तेव्हा गणित चुकतं!
आजीआजोबा नातवंडांबरोबर प्रेमानं वेळ घालवत असतात........ तोवर सगळं ठीक असतं
नात्याच्या दडपणाने ते बेबीसीटर होतात, तेव्हा गणित चुकतं!
पैसा हे एक चलन असतं.......... तोवर सगळं ठीक असतं
हे चलन जेव्हा ओळख बनतं, तेव्हा गणित चुकतं!
सगळं स्पष्ट, स्वच्छ, नि खरं असतं....... तोवर सगळं ठीक असतं
सगळंच गृहीत आणि सगळंच दिखाऊ होतं, तेव्हा गणित चुकतं!
माणूस प्रगत, विज्ञाननिष्ठ की काय असतो...... तोवर सगळं ठीक असतं
माणूस कधी कधी मशीनच होऊन जातो, तेव्हा गणित चुकतं!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा