मला काहीच येत नाही..........

मला पोळ्या येत नाहीत
मला भाजी येत नाही
मला लाडू, चिवडे, जॅम करून डबेही भरता येत नाहीत!
मला लोकांशी बोलता येत नाही
मला मुलांशी खेळता येत नाही
मला चालू असलेलं शांत बघत पुढेही जाता येत नाही!
मला भांडी घासता येत नाहीत  
मला फरशी पुसता येत नाही
मला नोकरी करून चार पैसेही मिळवता येत नाहीत!
मला व्यायाम येत नाही
मला कोडींग येत नाही
मला मेक अप, नखरे, शॉपिंग पण करता येत नाही!
मला भांडता येत नाही
मला तोडता येत नाही
मला जगताही येत नाही आणि मरताही येत नाही, मला काहीच येत नाही!

टिप्पण्या