अजून तरी सकाळी उठलं की तुझ्याकडे बघावंसं वाटतंय
अजून तरी तुझ्याशी तासनतास बोलावंसं वाटतंय
म्हणजे अजून तरी
सगळं ठीकठाक चाललंय!
अजून तरी तू चिडलास
की शांत राहावंसं वाटतंय
अजून तरी तुझं
चिडणं समजून घ्यावंसं वाटतंय
म्हणजे अजून तरी
सगळं ठीकठाक चाललंय!
अजून तरी तुला हवं
नको ते पाहावंसं वाटतंय
अजून तरी तुझ्याकडून
नवं शिकावंसं वाटतंय
म्हणजे अजून तरी
सगळं ठीकठाक चाललंय!
अजून तरी तुला
आवडतं ते खाऊ घालावंसं वाटतंय
अजून तरी जेवताना
तुझ्यासाठी थांबावंसं वाटतंय
म्हणजे अजून तरी
सगळं ठीकठाक चाललंय!
अजून तरी आपलं नातं
टिकून राहावंसं वाटतंय
अजून तरी एक तप
तुझ्याबरोबर चालावंसं वाटतंय
म्हणजे
अजून तरी सगळं ठीकठाक चाललंय!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा