कवी अनिल यांच्या 'वाटेवर काटे...' या कवितेचे विडंबन
पाठीवर दप्तर हे....
पाठीवर दप्तर हे
घेऊन चाललो
चाललो जसा तुरुंगात
चाललो |
अडकवून पाठीशी कधी,
डोक्यावर लटकवून कधी
आपलीच मान मोडून
चाललो |
शाळेचा डबाही आत,
रेनकोट-छत्रीही त्यात
मनाशीच हुंदका देईत
चाललो |
सुटली बुटाची लेस,
शाळेची दूर वेस
निसटता बूट फरफटीत
चाललो |
खांद्यावर बाळगिले
ओझे ममअभ्यासाचे
फेकून देऊन आता
खेळास चाललो |
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा