The story of Toilets, Telephones & other useful inventions

शाळेचं स्वत;चं ग्रंथालय आणि तिथून स्वत:चं स्वत: पुस्तक ठरवून घरी घेऊन यायचं. हा किती सुंदर संस्कार आहे नं, आमच्या वेळी म्हणजे अगदी लहान शाळेत बाईच शाळेत पुस्तक वाचून दाखवत, घरी बिरी नेण्याची मजा नव्हती. मोठ्या शाळेत गेल्यावर मुली पुस्तकं खराब करतात म्हणून शाळेतून घरी न्यायला परवानगी आहे अशी जी पुस्तकं होती ती कोणीही कधीही नेली नसती अशीच अधिक, त्यातून आमचं ग्रंथालय हेच वेगवेगळ्या नाटकाच्या सरावासाठीही वापरलं जाई त्यामुळे त्या बाई शांततेचा भंग केल्याबद्दल आधीच खर खाऊन असायच्या पुस्तकं कसली देतायत, यांनी नेलं त्यांनी नेलं असं चक्क खोटं सांगायच्या. या माझ्या अनुभवापुढे सध्या आमच्या चिरंजीवांच्या शाळेतून दर आठवड्याला एक पुस्तक घरी मिळणे हीच मला मेजवानी वाटते.
गेल्या आठवड्यात त्याने The story of Toilets, Telephones & other useful inventions हे पुस्तक आणलं होतं. लहान लहान कार्टून्स आणि त्याबरोबर लिहिलेली गोष्ट. गोष्टीची भाषा अगदी साधी सोपी. अर्थात नावाप्रमाणेच या गोष्टी होत्या नवनवीन शोधांच्या जन्मकथा. टॉयलेट, टेलीफोन, फुटबॉल चं नेट, रेफ्रिजरेशनचं तंत्र आणि जिलेट शेविंग मशीन या चार पाच गोष्टींचा उगम कसं झाला याच्या गोष्टी या पुस्तकात आहेत.
पूर्वी टॉयलेट कशी नव्हतीच, मग लोक चक्क गप्पा मारायची जागा म्हणून सभेला जावं तशी एकत्र टॉयलेटमध्ये जात इथपासून टॉलेट मध्ये जाऊन जे करतो ते काही सर्वांसह करावं असं नाही, किंबहुना मानवाला लाज वाटू लागली त्यानंतर टॉलेटचं, पॉटचं रुपडं कसं बदलत गेलं त्याची कहाणी वाचायला मिळाली, मग गाडी वळली टेलिफोनकडे. सर्वात आधी हवं हे आवाजाचं मध्यम असतं इथपासून तोंडापाशी धरायचा एक पीस, कानापाशी धरायचा दुसरा, मग फोनचे नंबर तारांना जोडून द्यावे लागायचे म्हणजे काय ते ट्रिंग ट्रिंग वाजून घरात फोन वाजू लागले तोवर ची प्रगती या मोबाईलच्या युगातील मुलांना वाचताना मोठी गंमतीदार वाटेल. फुटबॉलच्या एका सामन्यात नक्की गोल झाला की नाही यातून त्यासाठी जाळी असावी असं ठरलं, थंड प्रदेशातील लोकांना एकाने बर्फात महिनाभर साठवून ठेवलेले मासे खायला घातले आणि त्याची चव खरव न होता ते टिकून राहिल्याचेही दिसून आले, जिलेटने रेझरब्लेड चा शोध केवढा मोठे उपकार केले हे आणि असे शोध चित्रांबरोबर वाचायला अगदी नक्की आवडतील असे आहेत.

सध्याच्या सगळं काही चुटकीसरशी उपलब्ध होण्याच्या काळात पूर्वी हे नव्हतं तरीही लो कसे जगत होते हा ही विचार या निमित्ताने डोक्यात येऊन गेला आणि सतत शोध घेणारा मानव आपलं आयुष्य सोप्पं व्हावं म्हणून काय काय नि कसे प्रयत्न करीत असतो ते ही समजलं. यु एस बोर्न रीडिंग ची पुस्तकांची सिरीज लहानच काय मोठ्यांनीही नक्की वाचावी अशी आहे.  

टिप्पण्या