Photo by The Economic Times |
पाऊस काय किडे काय
निसर्ग काय कृत्रिम काय?
करोना काय लॉक डाऊन काय
इसेन्शियल काय नॉन इसेन्शियल काय?
मास्क काय व्हेंटिलेटर काय
टेम्प्रेचर गन काय मास्क काय?
सिम्टम काय रिपोर्ट काय
फालतू काय गंभीर काय?
लस काय फोटो काय
जादू काय चमत्कार काय?
होम स्कूलिंग काय वर्क फ्रॉम होम काय
ऑनलाईन काय ऑफलाईन काय?
व्यायाम काय आराम काय
शुद्धी काय बुद्धी काय?
भीती काय धाडस काय
खरं काय खोटं काय?
माझं घर माझी जबाबदारी काय आत्मनिर्भर काय
राजकारण काय समाजकारण काय?
सुटलो काय अडकलो काय
२०२० काय २०२१ काय?
चाल्लंय काय धावतंय काय
होतंय काय होणार काय?
शंका काय मदत काय
प्रश्न काय उत्तर काय?
सुख काय दु:ख काय
जीवन काय मरण काय?
दिशा काय प्रवाह काय
विषय काय कविता काय?
मी काय तुम्ही काय
हाय काय अन् न्हाय काय?
अगदी खर आहे !
उत्तर द्याहटवासुंदर काय वाईट काय ?
तुझं काय काय माझं काय ?
कशाचं काय न कशाचं काय ?
सुख काय दुःख काय ?
जीवन काय अन मरण काय?
हाय काय नाही का
Hmmmmmmm
उत्तर द्याहटवा