बघता बघता व्हाईलवन एक वर्षाचं झालं
इन्फायनाईट स्वप्नामधलं फायनाईट लूप पूर्ण झालं
मनापासून पास केल्यात लोड आणि स्ट्रेस टेस्ट
रिस्पॉन्स टाईम आता आमचा आहे सगळ्यात बेस्ट
आजवरच्या एक्सपीरियन्सचा डेटा बेस पक्का साथ देतोय
आमच्या इंजिनियरिंग परफॉर्मन्सचा बेंचमार्कही सेट होतोय
बायको म्हणते नोकरी सोडताना विचार कर एकदा
कंपनीतला बॉस म्हणतो दोस्ता, तू नको जाऊ बाबा
पण आता मागे सोडलंय बरंच काही, खूप पुढे आलोय
बाकी सब छोड छाड, आता आम्हीही स्केलेबल झालोय
की आता वाटतं मोठं व्हावं
फार नाही, दहा वीस मजल्यांचं ऑफिस व्हावं
भारताच्या नकाशावर आपलं टिंब दिसू यावं
की आता वाटतं मोठं व्हावं
टाटा बिर्ला अंबानीच्या यादी मध्ये सामील व्हावं
सेन्सेक्स आणि निफ्टीवर आमच्या शेअरनेही ट्रेड व्हावं
की आता वाटतं मोठं व्हावं
स्वप्नाचं वास्तव करण्यासाठी जिद्दीने पेटून उठावं
गेट्स, पिचाई, मस्क बरोबर मंगळालाही भेटावं
नंदिता
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा