पुन्हा एकदा जुनं पुस्तक वाचायला हवं
तेच तेच वाचताना, नवं काही उमगायला हवं
पुन्हा एकदा जुना डोंगर चढून यायला हवं
दगड-मातीशी आपलं नातं, कुरवाळायला हवं
पुन्हा एकदा लहान भावंडांना चिडवायला हवं
कुठकुठचे वाद, भांडणं उकरुन रडायला हवं
पुन्हा एकदा जुन्या दोस्तांना भेटायला हवं
वायफळ बडबडीत वेळेला दवडू द्यायला हवं
पुन्हा एकदा जुन्या चेहर्याला आठवून पाहायला हवं
खोट्या मुखवट्यांना, थोडं दूर ठेवायला हवं
पुन्हा एकदा जुन्या अस्वस्थतेला अनुभवायला हवं
उत्तरं शोधत दाहीदिशां, पुन्हा धावायला हवं
पुन्हा एकदा जुनं आभाळ भरून यायला हवं
लाईक्स आणि ख्याकच्या पल्याड जीवाला गुंतवायला हवं
-नंदिता
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा