देवा मायबापा,

 देवा मायबापा, पडो दे प्रकाश

दडपली जाओ, पॅंडोराची कुपी!

पाहून जाहले, भव्य दिव्य सारे

सामान्य राहू दे, जगणे आमुचे!

पुरता कळला, तुझा कारभार

आता खरोखरी, जाग आहे आम्हा!

तुझ्या त्या घड्याळी, न क्षणाचा फरक

अमुचेया हाती, नुरला वासर!

भाग्याचा खेळ हा, पुरे झाला बाबा

सुरळीत होवो, सारे चराचर!

तूच तूच तू रे, मानले प्रमाण

इवलासा जीव,  होई कासावीस!

मनू हा तत्पर, लेऊनि नव्हाळी

तुझे आशीर्वाद, हीच की दिवाळी!

विंदांच्या चरणी, वाहते ही ओळ

लाभो शब्द साज, शब्दांचीच माळ!

टिप्पण्या