लेकाच्या शाळेत कविता वाचन स्पर्धेसाठी कवितांचा शोध घेता घेता ही इंग्रजी कविता मिळाली, आवडली, डोक्यात रेंगाळत होती... त्या कवितेचा भावानुवाद करण्याचा हा मी केलेला पहिला प्रयत्न...
मूळ कविता:
Some One (1913)
Walter de la Mare
Someone came knocking
At my wee, small door;
Someone came knocking,
I’m sure — sure — sure;
I listened, I opened,
I looked to left and right,
But nought there was a-stirring
In the still, dark night;
Only the busy beetle
Tap-tapping in the wall,
Only from the forest
The screech owl’s call,
Only the cricket whistling
While the dewdrops fall,
So I know not who came knocking,
At all, at all, at all.
भावानुवाद:
ठक ठक, ठक ठक दारावरती
आले कोण ते, वाजवले बरं कुणी?
खचीत पक्की गोष्ट नक्की
ठक ठक, ठक ठक दारावरती!
कानोसा घेऊनि दार उघडले,
सरुनि पुढति, वळुन पाहिले;
कुणी न दिसले तेथ समोरी,
घनगंभीर अंधार सोडुनी;
किरकिरणार्या रातकिड्याने
उसंत काढून मला पाहिले.
घुबड दूरच्या झाडीमधूनि
शीळ घालूनि रागे भरले.
मारीत होती झिट्टी शिट्टी,
दवबिंदूंच्या तालावरती.
कोण आले ते मला न उमगे,
ठक ठक करूनि दारावरती.
कवितेचा अनुवाद पहिल्यांदा करतेय, तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया नक्की मार्गदर्शक ठरतील...
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवा