पृथ्वीभोवती असणाऱ्या वायूमंडलामुळे तिच्या दिशेने येणारे क्ष किरण, गॅमा किरण, अतिनील प्रकाशकिरण त्यांच्या लहरलांबीनुसार वाटेतच शोषले जातात. त्यांचे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत न पोहोचणे मानवजातीच्या कल्याणाचेच आहे. परंतु म्हणून त्यांच्या निरीक्षणाचा ध्यास मानवाने सोडलेला नाही, तो अंतराळतंत्रज्ञानात प्रगती करीत फुगे, रॉकेट, विमान वा उपग्रह यांची मदत घेत वायुमंडलाच्या वरच्या थरावरुन या किरणांचा वेध घेत आहे. क्ष किरण जेव्हा एखाद्या पदार्थातून सोडले जातात तेव्हा त्यांची त्या पदार्थातील अणूतील इलेक्ट्रॉन्सशी टक्कर होते. अशा वेळी ते इलेक्ट्रॉन्स क्ष किरणांकडून अधिक उर्जा घेतात किंवा अणूतील गर्भाच्या आकर्षणापासून मुक्त होतात. त्यामुळे त्यांच्यातील वाढलेली उर्जा दृश्य प्रकाशाच्या रुपात मोजता येऊ शकते किंवा मुक्त झालेल्या इलेक्ट्रॉन्समुळे क्ष किरणांच्या शक्तीचा अंदाज बांधता येऊ शकतो.
२३ जुलै १९९९
मध्ये भारतीय - अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ सुब्रह्मण्यम चंद्रशेखर
यांच्या सन्मानार्थ ‘चंद्रा’ हे नाव देण्यात
आलेली कृत्रिम उपग्रहाच्या स्वरूपातील अवकाशीय वेधशाळा नासाकडून प्रक्षेपित
करण्यात आली. या दुर्बिणीतील आरसे ईरीडियमपासून बनविलेले असून तिचे छिद्र १० मीटर
चे आहे. त्यामुळे ती इतर क्ष किरण दुर्बिणींच्या तुलनेत अधिक संवेदनशील आहे. या
दुर्बिणीतून अती उष्ण किंवा अती उर्जा उत्सर्जित करणाऱ्या भागांचा वेध घेतला जातो
त्यामुळे आकाशगंगेच्या विस्ताराचा अंदाज घेता येऊ शकेल. या वेधशाळेच्या माध्यमातून
तारायुगुले, प्रखर गुरुत्वाकर्षण असणाऱ्या जागा म्हणजेच
कृष्णविवरांच्या आकारमानाचे व त्याच्या आत पडणाऱ्या द्रव्याच्या उपलब्धतेचा शोध
घेण्याचे काम केले जाते. या सर्व प्रश्नांची उत्तरेच शेवटी विश्वाचे उगमस्थान
किंवा भवितव्य ठरवतील.
छायाचित्र व संदर्भ: https://svs.gsfc.nasa.gov/cgi-bin/details.cgi?aid=11185
आकाशाशी जडले नाते – डॉ. जयंत नारळीकर,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा